ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा दवाखाना सुरू करण्याची मागणी

अक्कलकोट, दि.८ : कोरोना व अन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा दवाखाना सुरू करण्याची मागणी अक्कलकोट शहर व तालुका एमआयएम पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.  सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

या अगोदर नगरपालिकेचा दवाखाना होता परंतु तो बंद झाला आहे तो त्वरित चालू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आज मुख्याधिकारी सचिन पाटील आणि नगराध्यक्ष शोभा खेडगी यांच्याकडे करण्यात आली आहे. कोरोनाची
साथ आल्यापासून सर्वच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला आहे.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना बेड आणि औषधांची गरज पडत आहे. अशावेळी अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा दवाखाना असणेफार महत्त्वाचे आहे. याठिकाणी गोरगरीब व रोजंदारी करून खाणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. आरोग्याच्या प्रश्नासाठी आपल्या हक्काचा दवाखाना असावा
अशी त्यांची देखील मागणी आहे.त्यासाठी आम्ही ही मागणी केली आहे.

ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काही नगरपरिषदांमध्ये त्यांचे स्वतःचे नगरपरिषद दवाखाने आहेत तसाच एक दवाखाना पाहिजे.अक्कलकोट शहरात आधी एक दवाखाना होता तो बंद अवस्थेत आहे तो पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत.पुढील पंधरा दिवसात नगरपालिकेने या प्रक्रियेला गती प्राप्त नाही केली तर अक्कलकोट शहरच नव्हे सोलापूर शहर व जिल्हा एमआयएमपक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शाब्दी
यांनी दिला आहे. तशा प्रकारचे निवेदनही देण्यात आले आहे.

यावेळी अक्कलकोट शहराध्यक्ष इरफान दावन्ना,  तालुकाध्यक्ष अतीक बागवान, युवक तालुकाध्यक्ष सैफन हगलदिवटे,  युवक शहराध्यक्ष सैफन शेख, कार्याध्यक्ष आसिम बागवान,सचिव मोहसिन मोकाशी ,अकीब बागवान,  हुसेन बळोरगी, मोहम्मद शिकलगार,  सद्दाम शेख, ख्वाजाभाई सुतार,  सैफन निटोरे,  अरयान शेख, आदम शेख,  मतिन शेख, सलिम गवंडी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!