ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केले गंभीर आरोप, फडणवीस म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला….

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केले आहेत. सोबतच त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.

 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन ‘कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो. परंतु, मला मातोश्रीचे दरवाजे बंद होते. एवढेच नाहीतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर केसेस टाकून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं. मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहेत.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आतापर्यंतची सर्व सरप्राईजेस संपलेली आहेत. त्यामुळं आता सरकारचा ए बी किंवा सी असा कोणताही प्लॅन नाहीये. आता फक्त लोकांचं काम करणं हाच प्लॅन आहे, त्यावरच आम्हाला फोकस करायचं असल्याचं फडणवीस म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी २०२४ मध्ये सर्वांना एक मोठं सरप्राईज देणार असल्याचाही खुलासा फडणवीसांनी केला आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकासकामं थांबलेली होती. आता राज्याला एका नव्या उंचीवर आणि विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम आमचं सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!