अकलूज :- काँग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष डाॅ धवलसिंह मोहिते पाटील हे गुरुवार दि.9 सप्टेंबर रोजी पदभार घेणार आहेत.अशी माहिती काँग्रेस भवनातील सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांची कार्यक्षमता असल्यामुळे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली आहे. राज्यातील काही जिल्हा अध्यक्षांच्या निवडीची घोषणा दिल्लीच्या हायकमांडने केली.त्यात सोलापूरचा समावेश आहे.
दिल्लीतील यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना भाऊ पटोले हे दिल्लीला गेल्यामुळे अधिकृतपणे नियुक्तीपत्र मिळाले नव्हते. मात्र पक्षशिस्तीनुसार प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.नाना भाऊ पटोले यांची वेळ घेऊन डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी शुक्रवारी मुंबईला जाऊन त्यांची भेट घेतली.त्यावेळी सन्मानपूर्वक जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.त्यानुसार गुरूवारी सकाळी 11 वाजता काँग्रेस भवनात जाऊन डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील हे अधिकृतपणे नूतन जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घेणार आहेत.त्यानंतर तात्काळ ते जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते,कार्यकर्ते,आजी – माजी पदाधिकारी आणि तालुका अध्यक्षांची बैठक घेणार आहेत.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेश कार्याध्यक्षा आ.प्रणितीताई शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्यातील पक्षसंघटनेची चळवळ गतिमान करण्यासाठी कशी पाऊले उचलण्यात येणार आहेत.काय दिशा असणार आहे,याची माहीती जिल्हा अध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील हे देणार आहेत. तरी गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी,सर्व सेलचे जिल्हा व तालुका अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे माजी प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले यांनी केले आहे.