अक्कलकोट, दि.९ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूल करत आहे.यापुढेही असेच कार्य संस्थेने चालू ठेवावे,अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.
स्वामी यांनी नुकतीच चपळगाव (ता. अक्कलकोट ) येथील रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलला भेट देऊन पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी
त्यांच्यासोबत बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव या उपस्थित होत्या.संस्थेचे अध्यक्ष सरपंच उमेश पाटील यांनी रिणाती संस्थेच्या भविष्यातील प्रकल्पाबाबत व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच भविष्य काळात अक्कलकोट
तालुक्यात रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूलमधून चांगले सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.यावेळी युवा नेते बसवराज बाणेगाव,तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील,शाळा व्यवस्थापक सुरेश सुरवसे आदींची उपस्थिती होती.या भेटी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलांची प्रगती पाहून सर्व शिक्षकांचे खूप कौतुक केले.शाळेत असलेल्या भौतिक सुविधाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील मुलांना शाळेच्यासमोर तयार
केलेली हिरवळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी प्राचार्य दिगंबर जगताप यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.