अक्कलकोट तालुक्यात ३६८ पैकी १०३ अंगणवाड्या आयएसओ; सीईओ स्वामी यांच्या हस्ते चपळगावात अंगणवाडी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ
मारुती बावडे
अक्कलकोट,दि. ७ : अक्कलकोट तालुक्यात ३६८ पैकी १०३ अंगणवाड्या आयएसओ असून उर्वरित अंगणवाड्याचे कामही प्रगतिपथावर आहे. लवकरच त्याही डिजिटल होतील, असा विश्वास सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.
शनिवारी,अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे अंगणवाडी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच अंगणवाडी केंद्र क्र.४७ च्या अत्याधुनिक वर्गखोलीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते
करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना स्वामी म्हणाले की, आजची लहान मुले हे उद्याच्या राष्ट्राचे भवितव्य आहेत. त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि संस्कार याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने अंगणवाड्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत आहे. मध्यंतरी कोरोना काळातही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कार्य
खूप मोलाचे ठरले.अक्कलकोट तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये चांगले चित्र असून त्यादृष्टीने आमच्याकडून त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बोलताना बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सध्या अक्कलकोट तालुक्यात ७२ अंगणवाड्यांच्या भिंती ह्या बोलक्या आहेत.त्या लवकरात लवकर डिजिटल करून त्याही आयएसओ बनण्याचा प्रयत्न करू.तशा सूचना संबंधितांना देण्यात आले
आहेत.सरपंच उमेश पाटील यांनी चप्पळगाव येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अंगणवाडी केंद्राबाबत माहिती देऊन अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक केले.
व्यासपीठावर सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी शितल बुलबुले,विस्ताराधिकारी भीमराव तुळजापुरे,व्ही.व्ही.पोतदार,आयएसओ डायरेक्टर सुनिल राठोड,पर्यवेक्षिका स्वरांगी गायकवाड,युवा नेते बसवराज बाणेगांव,तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील,ग्रामसेवक सदाशिव कोळी,शरणू पाटील,ग्रा.पं.सदस्य सुवर्णा कोळी,श्रावण गजधाने,महिबुब तांबोळी,मनोज इंगुले,प्रदीप वाले,महादेव वाले,गणेश कोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात माझी कन्या समृध्द योजनेतील लाभार्थींना सीईओंच्या हस्ते धनादेश देण्यात आले.तर तालुक्यातील सांगवी बु.येथील अंगणवाडीला आयएसओ मानांकनाने गौरविण्यात आले.सीईओ स्वामी यांच्या हस्ते ‘ साजरा करूया स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,करुनी अंगणवाडी प्रवेशोत्सव’या कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला.कार्यक्रमास मुख्याध्यापक दिगंबर जगताप,सुरेश सुरवसे,मंगल पाटील,
भौरम्मा तोळणूरे,प्रकाश बुगडे,दिपक भंडारकवठे,उमेश सोनार,विष्णुवर्धन कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व अंगणवाडी सेविका-कर्मचारी,आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पाटील व दिपाली काळे यांनी तर आभार पार्वती कांबळे यांनी मानले.