ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आदर्श शिवसैनिक पुरस्कारांचे वितरण,शहर शिवसेनेकडून आयोजन

सोलापूर,दि.१२ : (प्रतिनिधी )शहर शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आदर्श शिवसैनिक पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्तम कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शिवसैनिकांना यावेळी गौरविण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख आणि संयोजक गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, शंकर चौगुले, संतोष पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, भक्ती जाधव, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, राजकुमार हंचाटे, निरंजन बोद्धूल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हासंघटक लहू गायकवाड,
शहरसंघटक तुषार अवताडे, रिक्षा सेनेचे शहरसंघटक बबलू खरात, रिक्षासेनेचे जिल्हा संघटक सुरेश जगताप, शिवसेना प्रभाग क्रमांक तीनचे विभागप्रमुख शिवा ढोकळे, माजी परिवहन सभापती व जय महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम मस्के, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांना गौरविण्यात आले.

स्मृतिचिन्ह, फेटा देऊन जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर चौगुले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

‘निष्ठावान शिवसैनिक हीच शिवसेनेची संपत्ती आहे. निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरच आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा मनपावर फडकेल’, असा आशावाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख श्री. बरडे म्हणाले, शिवसैनिकांचा सन्मान होणे आवश्यक आहे. शिवसैनिकांनी निस्वार्थपणे केलेल्या कार्यामुळेच शिवसेना आज घराघरात पोहचली आहे. आजवर शिवसेनेवर अनेक संकटे आली. परंतु शिवसेना खंबीरपणे उभी राहिली. त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आपल्या सोबत कोण आहे अथवा नाही याचा विचार न करता शिवसैनिकांनी महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी कार्यरत रहावे.

जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, शिवसैनिकांनी आजवर अनेक आंदोलने केली, समाजोपयोगी कामे केली. अशांचा सन्मान होणे कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागातही असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शहर प्रमुख आणि संयोजक गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांची ऊर्जा आहे. त्यांची जयंती शिवसैनिकांनी अत्यंत उत्साहात आणि नाविन्यपूर्ण पध्दतीने केली. अशा शिवसैनिकांचा सन्मान व्हावा या हेतूने हे पुरस्कार देण्यात आले आहेत. शिवसैनिकांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी निकोप स्पर्धा असावी. भविष्यात असे सन्मान स्वीकारणाऱ्या सैनिकांची संख्या दसपटीने वाढावी अशी अपेक्षा ही धुत्तरगांवकर यांनी व्यक्त केली.

उपजिल्हाप्रमुख अमर पाटील म्हणाले, अशा पुरस्कारातून आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा निश्चित मिळते.

विनायक दुदगी यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख आणि संयोजक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक तर प्रसिद्धीप्रमुख निरंजन बोद्धूल यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमास संताजी भोळे, बाळासाहेब माने, जयंत कदम, शशिकांत बिराजदार, सोमनाथ शिंदे, सचिन गंधुरे, रोहित तडवळकर, प्रभाकर गंपले, आनंद मुसळे, जयराम सुंचू, सिध्दाराम खजुरगी, नरेंद्र क्षीरसागर, देविदास कोळी, केदार बरगाले, धानप्पा निंबाळ, उमेश जेटगी, गजानन केंगनाळकर, बसवराज जमखंडी, रितेश मार्गम, पृथ्वी खैरमोडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!