ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लायन्स क्लब दुधनी इंटरनॅशनलकडून गरजू व्यक्तींना चादरी वाटप

दुधनी दि.०३ : जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्यसाधून दुधनी लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून दुधनी येथे गरीब गरजू लोकाना चादरीचे वाटप करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याची दखल घेऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनलला तातडीची मदत मागितली होती. कापसे यांच्या प्रयत्नाला यश येऊन ती मदत मंजूर झाली. आलेल्या मदतीचे वाटप दुसऱ्या टप्प्यात वस्तूरुपात करण्यास सुरू करण्यात आली.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विजयपूर येथील ज्ञानयोगी आश्रमाचे लिंगैक्य सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रतिमा पूजा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन त्यानंतर लिंगैक्य सिद्धेश्वर स्वामीजी यांना श्रद्धांजलि वाहण्यात आले. त्यानंतर गरजू लोकाना चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांतपाल राजशेखर कापसे, उप प्रांतपाल पहिला भोजराज नाईक निंबाळकर, उप प्रंतपाल एम के पाटील, प्रांतीय सचिव सुभाष गडासिंह, ऑडिशनल सचिव अशोक भांजे, फलटणचे लायन सुरेश भोंगळे, दुधनी लायन्स क्लबचे अध्यक्ष  संतोष जोगदे, उपाध्यक्ष राजशेखर दोशी, डॉ. उदय म्हेत्रे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीपुत्र पाटील, मलकाजाप्पा अंदेनी उपस्थित होते.

त्यानंतर दुधनी लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून मान्यवरांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाचलाप्प बाबा, गुरुनाथ चितली, प्रभुलिंग यळसंगी, सिद्धू राठोड, गुरय्या सलगर, विद्या चिंचुरे, सिद्धाराम चौधरी,  महंतेश कर,  श्रीशैल मलगण, शाळा व्यवस्थापन समितीचे महिला सभासद सुहासिनी गद्धी, दिपीका बंद्राड, प्रेमा पादी, लक्ष्मी काळे, मल्लम्मा कल्लुर, सुजाता हिरोळी आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!