ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होतेय याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होतेय – नवाब मलिक

मुंबई दि. २८ ऑगस्ट – सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ईडी व सीबीआय यांचा देशातील तपास ज्यापध्दतीने सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने एकप्रकारे शंका निर्माण केली आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही एजन्सींना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते मात्र त्यांनी याद्या देऊन त्यांचं काम पूर्ण झालं अशी भूमिका घेतली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

ईडी व सीबीआयकडे राजकीय व इतर किती केसेस प्रलंबित आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. याचाच अर्थ ईडी व सीबीआय या एजन्सींच्या कारवाईवर शंका उपस्थित होते आहे.

खडसे यांची संपत्ती जप्त करण्यात आली तर काहींना वारंवार बोलावून त्रास दिला जातोय अशा प्रकारे राजकीय दबावाने काम सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!