ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्या शिबिरात 51 जणांचे रक्तदान

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण होत आठव्या वर्षी पदार्पण होत असल्यानिमित्त डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामधे 51 रक्त दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथे डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्यावतीने प्रथमच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण होत असून आठव्या वर्षी पदार्पणनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. हेडगेवार ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने शिबिरास सुरुवात झाली. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 51 जणांनी रक्तदान करीत आपले योगदान दिले. कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करीत रक्तदान शिबिर पार पडले.

यावेळी रुद्रमुनी हिरेमठ, योगेश हिरेमठ, सोसायटी चेअरमन शंकर पाटील, सोमनाथ कुंभार सर, जगद्गुरु पंचाचार्य हायस्कूल कर्मचारीवृंद, माजी सरपंच वीरभद्र सलगरे, श्रीमंत पाटील, मल्लिनाथ सलगरे, बसन्ना माशाळे, माजी सरपंच सिद्धाराम म्हेत्रे, रमेश माशाळे, राजू खानापुरे, सतीश पाटील, विवेकानंद वाघमोडे, नितीन नन्नवरे, जकप्पा पुजारी, रामदास वाघमोडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल म्हेत्रे, उपाध्यक्ष विठ्ठल चलगेरी, सदस्य सागर हडपद, बसू पाटील, नागनाथ माशाळे, शिवानंद पाटील, शिवानंद कुंभार,प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी, सदस्य, गावकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!