क्षेत्र कोणतेही असो,उच्च ध्येय ठेवल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही,असे म्हणतात.अगदी त्याच गोष्टीचा प्रत्यय अक्कलकोट येथील डॉ.प्रथमेश सी.मलगोंडा यांच्याकडे बघून येतो.डॉ.मलगोंडा हे अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा यांचे ते
सुपुत्र आहेत आणि माजी शिक्षण राज्यमंत्री कै.पार्वतीबाई मलगोंडा यांचे ते नातू आहेत. तसा या घराण्याला राजकीय वारसा आहे परंतु वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवावे आणि
या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी असा विचार मनात ठेवून डॉ.प्रथमेश यांनी मारलेली भरारी खरोखर कौतुकास्पद आहे.कमी वयात त्यांनी या क्षेत्रातील अनेक टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत.अजून खूप
टप्पे बाकी आहेत.अक्कलकोट शहर आणि तालुक्यात आजही त्यांच्या मातोश्री डॉ.सुवर्णा मलगोंडा यांचे नाव घेतले की लोक आदराने बोलतात आणि विचारपूस करतात.त्यांचे नाव सुपरीचित असे आहे परंतु या नावाचा
वारसा पुढे अधिक जोमाने चालावा यासाठी डॉ.प्रथमेश यांनी अपार मेहनत घेतली आहे.या जोरावर त्यांची वाटचाल सुरू आहे.त्यांचे प्राथमिक आणि हायस्कूलचे शिक्षण सोलापुरात झाले आहे.बारावीला महाराष्ट्र सीईटीमध्ये चांगले गुण मिळवून कृष्णा मेडिकल कॉलेजला त्यांनी एमबीबीएसला प्रवेश घेतला.२००९ ते १५ मध्ये त्यांनी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड
येथे हे शिक्षण पूर्ण केले.तिथे देखील त्यांनी आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेची व कौशल्याची चुणूक दाखविली आणि मेडिसिन व गायनॅक प्रसुती शास्त्र या दोन्ही विभागात गोल्ड मेडल मिळविले.त्यावेळी त्यांना सिक्कीमचे तत्कालीन राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गौरव झाला.त्यानंतर ऑल इंडिया सीईटीतून २०१५ ते १८ मध्ये कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कॉलेज,हुबळी येथून त्यांनी एम.एस जनरल सर्जरी ही पदवी प्राप्त केली.ऑल इंडिया नीट परीक्षेमध्येही त्यांनी चांगले गुण मिळवून भुवनेश्वर (ओरिसा) येथे एमसीएच ओन्कोलॉजी शिक्षणासाठी निवड झाली.
पण अगदी कमी वयात ओन्को सर्जन ( कॅन्सर तज्ञ) होण्याचा मान त्यांनी मिळवला.आता सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रावर जर एक नजर टाकली तर बोटावर मोजण्या इतपत ओन्को सर्जन सोलापूरात आहेत.त्यात
डॉ.प्रथमेश हे रुजू झाले आहेत.शिक्षण
घेताना शस्त्रक्रिया हा भाग खूप गुंता गुंतीचा असतो पण त्यातही त्यांनी चांगले कौशल्य प्राप्त केले.पदवी घेत असताना केवळ अभ्यास केला नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पेपर प्रेझेंटेशन देखील सादर केले आहेत.खरे तर वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवणे आणि
त्यात आत्ताच्या घडीला स्पर्धेच्या युगात यशस्वी होणे ही गोष्ट सोपी नाही पण अक्कलकोटसारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन आपल्या कुटुंबाच्या नावाचा वारसा
पुढे नेण्याचे काम डॉ.प्रथमेश हे नेटाने केले आहे.तसे पाहिले तर डॉ.सुवर्णा मलगोंडा ह्या नाव वैद्यकीय क्षेत्रात सुपरिचित आहेतच.त्यांच्या नावाचा लौकिक ग्रामीण भागात आहेच.हा वसा आता डॉ.प्रथमेश पुढे घेऊन जाणार यात शंका नाही.खरे तर ते शिक्षण घेऊन सोलापूर येथे येणे
ही सोलापूरकरांसाठी उपलब्धी आहे.आता अक्कलकोट व सोलापूरच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी सध्या सोलापूरच्या कॅन्सर हॉस्पिटल येथे डॉ.फहिम गोलीवाले यांच्याकडे कन्सल्टंट ओन्को सर्जन म्हणून सेवेत दाखल झाले आहेत.सिटी प्राईड बिल्डींग फस्ट फ्लोअर,व्हीआयपी रोड संगमेश्वर कॉलेज जवळ सोलापूर येथे व नवीन यशोधरा हॉस्पिटल,हैदराबाद रोड सोलापूर येथेही
कन्सल्टंट ओन्को सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतात.त्याशिवाय अक्कलकोट येथील
ए- वन चौकातील मलगोंडा हॉस्पिटलमध्येही
ते उपलब्ध आहेत.गरजू रुग्णांनी ८३०८०७१००८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.त्यानिमित्ताने डॉ.प्रथमेश मलगोंडा यांना हार्दिक शुभेच्छा !
मारुती बावडे,अक्कलकोट