ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनीत होम विधी भक्तिमय वातावरणात संपन्न.. ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री सिध्देश्वर महाराज की जय हर्रऽऽ’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला

दुधनी दि. १६ : दुधनीचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी होम मैदानावरील होम प्रदिपन सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला. यावेळी सिध्देश्वर भक्तांनी ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री सिध्देश्वर महाराज की जय हर्रऽऽ’ असा जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकला. होमविधीसाठी आलेल्या भाविकांमुळे सिद्धेश्वर मंदिर परिसर फुलून गेला होता. योगदंडाच्या साक्षीने होमविधीचे पूजाविधी दुधनी विरक्तमठाचे मताधिपती डॉ. शांतलिंगेश्वर स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात मानकरी इरय्या पुराणिक, चन्नवीर पुराणिक व मंदिर समितीच्या सदस्यांनी होम कुंडामध्ये उतरवून मनोभावे होमाचे पूजा केली.

प्रारंभी येथील मल्लिकार्जुन मंदिरात मानाचे पाच नंदीध्वजांचे पूजन करण्यात येऊन त्यांनंतर एक नंदी ध्वजाला नागफणी बांधण्यात आले. त्यानंतर पाचही नंदीध्वज शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूकीने सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. मानाचे सर्व नंदीध्वज साडे दहाच्या सुमारास होम कट्ट्याजवळ दाखल झाले. त्यानंतर होम विधीसाठी लागणार लाकडाचे पाच मोळी महांतेश पाटील परिवाराकडून सवाद्य वाजत गाजत होमकट्याकडे आणण्यात आले.

होमविधी सोहळ्या निमित्त होमकट्ट्याला विविध फुलांनी, केळीच्या बनाने, उसाच्या कांड्याने सजविण्यात आले होते. बाजरीच्या पेंडीने तयार केलेल्या कुंभार कन्येस सौभाग्य अलंकाराने सजविण्यात आले होते. मणी-मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार दांडा घालून कुंभार कन्येचा विधीवत पूजा करण्यात आली. होमाला फुले व फळे अर्पण करून दर्शन घेण्यात आले. त्यानंतर श्री सिद्धरामेश्वर यांच्या जयघोषामध्ये दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते होम प्रदीपन करण्यात आले. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन पालखी समवेत पुरवंतानी होमाला पाच प्रदिक्षणा घातल्या. त्यानंतर उपस्थितांनी एक मेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

या होम प्रदीपन सोहळ्यास देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, शिवानंद माड्याळ, मलकाजप्पा अल्लापुर, गुरुशांतप्पा परमशेट्टी, मल्लिनाथ येगदी, भाजप शहराध्यक्ष अप्पू परमशेट्टी, महेश बाहेरमठ, भीमाशंकर अल्लापूर, उमेश धल्लू, राजशेखर कौंची, राजू सोळशे, अतुल मेळकुंदे, गुरूशांत उप्पीन, महांतेश बिराजदार, मल्लिनाथ मातोळी, विशाल येगदी, गुरबसप्पा पाटील, महेश घुळनुर, संतोष पोतदार, सागर अमाणे, कुमार काळजे, शांतप्पा टक्कळकीसह दुधनी, सिन्नूर, रुद्देवाडी, आंदेवाडी, मुगळी, चिंचोळी, बबलाद परिसरातील सिद्धेश्वर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रात्री शोभेचे दारू कामाने यात्रेचे सांगता होणार आहे तर उद्या सायंकाळी प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!