अक्कलकोट, दि.११ : बहुचर्चित संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापतीपदी सातलिंगप्पा उर्फ अप्पू परमशेट्टी ( दुधनी ) यांची तर उपसभापतीपदी सिद्धाराम बाके ( उमरगे ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक बाजार समितीच्या कार्यालयात गुरुवारी पार पडली.यावेळी दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक झाल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.दुधनी बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली आहे भाजपचे पहिले सभापती म्हणून परमशेट्टी यांना मान मिळाला आहे.या निवडणुकीमध्ये एकूण १८ जागांपैकी १२ जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले होते.गेल्या चार दिवसांपासून दुधनी बाजार समितीचे सभापती व उपसभापती कोण याची चर्चा सुरू होती.अखेर आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चे अंती ही दोन नावे निश्चित करण्यात आली. निवडीनंतर सभापती व उपसभापती यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले,
शेतकरी, कामगार, व्यापारी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळण्यासाठी चांगले हमीभाव केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नगरपालिकेत देखील अशाच प्रकारे सहकार्य करून विरोधकांना धडा शिकवावा,असे आवाहन त्यांनी केले.माजी आमदार सिद्रामप्पा पाटील म्हणाले,विरोधकांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी मी देखील मागच्यावेळी खूप प्रयत्न केला होता परंतु थोडक्यात
पराभव झाला होता यावेळी मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे परिवर्तन शक्य झाले आहे. यापुढेही दुधनी भागातील जनतेने भाजपला मतदान करून सहकार्य करावे आणि विकास साधावा,असे आवाहन त्यांनी
यावेळी केले.यावेळी भाजपचे जेष्ठ माजी नगरसेवक महेश हिंडोळे,तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन,माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,
महेश पाटील,अप्पासाहेब पाटील,विवेकानंद उंबरजे,अण्णाराव
बाराचारी,अतुल मेळकुंदे,सुरेखा होळीकट्टी,तुकप्पा नागुर,बसवराज गंगोडा, परमेश्वर यादवाड,
अरविंद ममनाबाद,प्रकाश पाटील,राजकुमार झिंगाडे,सुभाष परमशेट्टी,मल्लिनाथ येगदी,इरय्या पुराणिक,
बाबा टक्कळकी,शिवानंद हौदे,हणमंत कलशेट्टी आदींसह
भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.