ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नाही, एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

मुंबई वृत्तसंस्था 

 

महाराष्ट्रात महायुतीने मोठी बाजी मारली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  राज्यात महायुतीला लोकांनी जो कल दिला आहे ते लाडक्या बहिणीचे प्रेम आहे, अडीच वर्षे केलेल्या कामाची पोचपावती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांचा हा कल महायुतीला मिळाला आहे. आम्हाला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी मतदान केलं. त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभार. समाजातल्या प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केलं. गेले अडीच वर्षे आम्ही जे काम केलं त्याची ही पोचपावती आहे. मी लोकांचे आभार मानतो.  पुढच्या कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे.

तसेच ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही, ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ. असे शिंदे म्हणाले आहेत.

राज्यात सर्वाधिक जागा या भाजपच्या येणार असल्याचं चित्र आहे. एकट्याच्या भाजपच्या 125 हून अधिक जागा येतील असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी भाजपचा उमेदवार असेल असा दावा केला जात आहे.

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रिपदी शिंदे गटाचा दावा असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाच्या शितल म्हात्रे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे महायुतीला एवढं यश मिळालं. महायुतीने या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. लाडकी बहीण ही त्यांची योजना होती. त्यामुळेच महायुतीला हे यश मिळालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!