डाॅ.तानाजी सावंत यांच्यामुळे आरोग्य क्षेत्रात कमालीची शिस्त ; वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम
अक्कलकोट,दि.१५ : आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे आरोग्याच्या बाबतीत खूप चांगले काम करत असून त्यांच्यामुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे. त्यांच्या कडक शिस्तीच्या कारभारामुळे प्रशासनात गतिमानता आली असल्याचे गौरवोद्गार तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी काढले. बुधवारी,अक्कलकोट शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामीण रुग्णालय येथे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा यांनी केले. यावेळी डॉ.पवित्रा मलगोंडा, गटविकास अधिकारी सचिन खुडे, डाॅ. शिवणगी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, शिवसेना विधानसभा संघटक प्रा. सुर्यकांत कडबगावकर, शहर प्रमुख योगेश पवार, कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे, तालुकाउपप्रमुख उमेश पाढंरे, चंद्रकांत वेदपाठक, बसवराज बिराजदार, परशुराम जाधव, युवासेना शहरप्रमुख विनोद मदने आदींच्या उपस्थितीत आरोग्य शिबीराची सुरवात करण्यात आली.
मान्यवराचें स्वागत डॉ.अशोक राठोड यानी केले. वाढदिवसानिमित्त आज दिवसभर ओपीडी मोफत ठेवण्यात आली होती. महिलांसाठी विविध प्रकाराच्या आजारावर तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. शारदामाता इंग्लिश मिडियम स्कुल येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप जिल्हाप्रमुख महिला आघाडी शिवसेना रविना राठोड यांच्या अध्यक्षेखाली तालुकाप्रमुख महिला आघाडी वर्षाताई चव्हाण, शहरप्रमुख वैशाली हावनूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी प्रस्तावना केले. शाळेचे मुख्याध्यापक अभय शेटे यानी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर, कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे, उपप्रमुख परशुराम जाधव, इंदूमती वाघमारे, ताराबाई कुभांर, अनिता घोडके, लता गायकवाड मुख्याध्यापिका गिरिजा एकबोटे, सुप्रिया पंडीत यांच्यासह शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.