अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेस मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याने व पिडीताच्या पतीस दगडाने मारहाण केल्याप्रकरणी उमेश सुरेश कोळी रा शिरसी ता अक्कलकोट याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान पीडिता पिण्याचे पाणी भरत असताना संशयित आरोपी उमेश सुरेश कोळी हा तिथे येऊन पीडितास तू माझ्या प्रश्नांचे उत्तर का देत नाहीस असे म्हणत पीडिताचे हात पकडून तू मला आवडतेस असे म्हणत पीडिताच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.इतक्यावरच न थांबता तू माझ्या सोबत चल असे म्हणू लागल्याने पीडिता ही आरडाओरडा केली असता संशयित आरोपीने पकडलेला हात सोडून पळ काढला.त्यानंतर पीडिता,पती व भाऊ हे उमेश कोळी यास घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरासमोर गेले असता आरोपीने “मी काय करायचे ते करतो तू कोण विचारणारा असे म्हणत धमकी देऊन शिवीगाळ करून बाजूला पडलेल्या दगडाने पीडिताच्या पतीस हातावर मारून जखमी केले व पीडिताचे हात पकडून मनाला लज्जास्पद वर्तणूक करत विनयभंग करीत दमदाटी केली म्हणून पीडिताने संशयित आरोपी उमेश सुरेश कोळी रा शिरसी ता अक्कलकोट याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.