अखेर गुलाबराव पाटलांनी मागितली “त्या” वक्तव्य प्रकरणी माफी, म्हणाले आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर…
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना उद्देशुन बोलताना शिवसेनेचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी टिका केली होती.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य विरोधात राज्य मालिका आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटलांवर कारवाई करण्याचां इशारा दिला होता. रुपाली चाकणकर यांच्या पाठोपाठ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. तसेच जाहीर माफी मागण्याची मागणी केली होती. अखेर गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. “गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो.” अशा शब्दात माफी मागितली आहे.
काय केला होता वक्तव्य?
महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर जोरदार टीका केली. टीका करताना पाटील म्हणाले, माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना आव्हान आहे, त्यांनी मतदारसंघात येऊन मी केलेला विकास पहावा. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी तयार केले आहे. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला होता.