ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तडवळ येथील व्ही.पी शुगरकडून पहिला हप्ता २ हजार २०० चा जाहीर; शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मागणीला यश

अक्कलकोट : तडवळ येथील व्ही. पी शुगरने पहिला हप्ता २ हजार २०० चा आणि उर्वरित रक्कम एफआरपीनुसार देण्याचे मान्य केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तडवळ येथील व्ही पी शुगर कारखान्यासमोर काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. अखेर चौथ्या दिवशी कारखाना प्रशासनाने उपोषणाची दखल घेत मागणी मान्य केली आहे. कारखाना व्यवस्थापकांनी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपये पर्यंत रिकव्हरीनुसार उसाला भाव देण्याचे मान्य केले आहे. संबंधित उस दर भाववाढी संदर्भातील लेखी पत्रच उपोषणकर्त्यांना देण्यात आले. उसाच्या एफआरपी मध्ये पारदर्शकता असावे,वजन काटा सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षेत माप द्यावे, आदी सर्व मागण्या मान्य केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन साहेबराव पाटील व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चेअंती हा दर ठरविण्यात आला. यावेळी शिवसेना उपप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, शहर संपर्कप्रमुख अतुल भवंर, संतोष केंगनाळकर, शहर उपप्रमुख राजु बिराजदार, युवा सेना उपजिल्हा अधिकारी शरण सुरवसे, तालुका संघटक सोपान निकते, शहर प्रमुख मल्लिनाथ खुब्बा, शहर संघटक स्वामीराव मोरे, तालुका उपप्रमुख राजु गुणापुरे, संतोष रत्नाकर, श्रीशैल स्वामी, गुरनिंगप्पा पाटील, धनराज चव्हाण, हणमंत नागपुरे, किसन राजपुत, मल्लिनाथ पाटील, रफीक मुजावर, उमेश साळुंखे, दर्याप्पा तोळनुरे, बिरू माळगे, बसवराज पुजारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!