ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अकोल्याच्या भारत जोडो यात्रेत माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे सहभागी होणार

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.२१ :- केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने तीन हजार पाचशे किलोमीटरची राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात निघालेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात आल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी अशपाक बळोरगी हे सहभागी होणार आहेत.

सात सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत निघालेली ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यात १६ दिवसांचा प्रवास करणार आहे. ही यात्रा जोरदार यशस्वी होण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले पाच जिल्ह्यात पाच जणांवर जबाबदारी सोपवली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर अकोला जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी म्हेत्रे यांच्यासह मल्लिकार्जुन पाटील, अरुण जाधव व अन्य काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह अकोला येथे सहभागी होऊन बुलढाण्यापर्यंत भारत जोडो यात्रेत प्रवास करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!