ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आशादायक: जीडीपी वाढणार: मुडीजचा अंदाज

नवी दिल्ली: मागील वर्षभरापासून कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली आहे.  आर्थिक मंदीतून देश हळूहळू सावरत आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.  मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज १०.८ टक्क्यांपासून वाढवून १३.७ टक्क्यांपर्यंत केला आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी यूएस-आधारित मुडीज या रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की, अर्थव्यवस्था ७ टक्क्यांपर्यंत घसरेल, जी आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. या आधी मुडीजने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये १०.६ टक्क्यांपर्यंत घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!