सोलापुर : प्रभाग क्रमांक ४ आणि ८ रखडलेली स्मार्टसीटीचे प्रलंबित कामे लवकरात लवकर करावेत. पावसाळ्या मध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होणार आहे तो दूर करावा अशी मागणी आज सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्या निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात आयुक्तांची सभागृह नेत्यांनी तात्काळ भेट घेतली हे काम मार्गी लावतो अशी माहिती पी.शिवशंकर यांनी दिली.
यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, विनायक विटकर, अमर पुडले, अजित गायकवाड, ज्ञानेशवर कारभारी, नारायण बनसोडे, अतिश होसमणे आदीजन उपस्थित होते.
आमच्याकडे बजेट उपलब्ध असून आयुक्तांनी वाढीव बजेटसाठी दोन ओळींचे पत्र द्यावे. पत्र मिळताच तात्काळ स्मार्ट सीटीचे रखडलेली कामाला मार्गी लावतो अशी प्रतिक्रिया स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिली.
सदरचे कामाची निविदा चालू काँट्रॅकटर ला द्यावीत जेणेकरून त्याला ते काम माहिती असल्याने ते काम कमी कालावधीत पूर्ण होईल अशी मागणी नगरसेवक अमर पुदाले यांनी सीईओ यांच्याकडे बैठकीवेळी केली.
वाढीव बजेटसाठी पत्र मी तात्काळ देतो अशी प्रतिक्रिया आयुक्त पी.शिवशंकर यांनी सभागृह नेते आणि नगरसेवकांना दिली.
जुलै महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो रखडलेल्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलदल होऊ शकते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हिणारा नाहक त्रास दूर करावा अशी मागणी नगरसेवक विनायक विटकर यांनी केली.
स्मार्टसीटीच्या कामाची बैठक गेल्या १५ दिवसांपूर्वी आ.विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे ते कामे मार्गी लागलेले नाही. जनतेने आम्हाला निवडुन दिल आहे त्यांच्यासाठी आम्ही कायम लढत राहू अशी प्रतिक्रिया नगरसेवक नागेश भोगडे यांनी दिली.