ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उर्फी जावेदला पोलीस संरक्षण द्या, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाकडे धाव घेत उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने आदेश दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद हिला पुरेसे संरक्षण द्यावे आणि यासंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना दिला आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. अर्जात उर्फी जावेद यांनी म्हटले आहे की, त्या सिनेक्षेत्राशी संबंधित असुन अनेक वर्षांपासुन फॅशन इंडस्ट्रिमध्ये काम करत आहेत. त्यांचे राहणीमान आणि दिसणं त्यांना व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे. असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायदयाकरिता किंवा वैयक्तिक प्रसिध्दीकरिता उर्फी जावेद यांना मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांवरुन जाहिरपणे दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!