ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी वनिता सुरवसे तर उपसरपंचपदी कमलाकर सोनकांबळे यांची निवड

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात श्री अध्यासी अधिकारी पी. जी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंचपदी सौ. वनिता मधुकर सुरवसे आणि उपसरपंचपदी कमलाकर सोनकांबळे यांचे एक एक अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली.

गोगांव ग्रामपंचायतीचे निवडणूक होळे पाटील, मुळजे व आलूरे गटाविरोधात श्री कलेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्वंच्या सर्व सात उमेदवार प्रचंड मताने निवडून आले आहेत. गेल्या २०-२५ वर्षांपासून गोगांव गावच्या विकासासाठी श्री प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी काम अविरतपणे चालू आहे यावेळी देखील प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनल प्रमुख मधुकर सुरवसे, अशोक मुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातच्या सात उमेदवार विजयी झाले आहेत.

नूतन सरपंचपदी निवड झाल्यानंतर बोलताना सरपंच सौ.वनिता सुरवसे म्हणाल्या की, माझ्यावर खूप मोठी जबाबदारी गावकऱ्यांनी सोपवली असून गावच्या विकासासाठी मी अखंड प्रयत्न करणार आहे. गोगांव गाव डिजिटल व अक्कलकोट तालुक्यात एक वेगळे विकासात्मक गाव बनविण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी व प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे, असे मत व्यक्त केले.

यावेळी अध्यसी पाटील, सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सदस्य प्रदीप जगताप, लक्ष्मण बिराजदार, सौ. महादेवी होळे, सौ. ललिता कलशेट्टी, सौ. कलावती गायकवाड यांच्या उपस्थितीत पहिली सभा संपन्न झाली. यावेळी ग्रामसेवक बिरप्पा वडरे यांनी अध्यसी अधिकारी यांना सहकार्य केले. सरपंच व उपसरपंच यांना पुढील कार्यास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी फोन वरून शुभेच्छा दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!