ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकुळचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा ऊस उत्पादकांनी केला सन्मान; उच्चांकी दर दिल्याने गावोगावी शेतकऱ्यांनी केले स्वागत

 

अक्कलकोट, दि.१३ : गोकुळ शुगर्स कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांची नाळ घट्ट जोडली पाहिजे.शेतकऱ्यांना गोकुळ शुगर्स हा माझा कारखाना वाटला पाहिजे.
शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर कारखान्यावर विश्वास ठेवावा, तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही आणि दर देताना मात्र मी कधीच मागे पुढे पहाणार नसल्याचे मत
गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी
येथे बोलताना व्यक्त केले.

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील श्री बमलिंगेश्वर मंदिरात सन २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन २८०० रुपये पहिली उचल जाहीर करुन उस उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा दिल्याने चेअरमन शिंदे यांचा हंजगी गावातील उस उत्पादक शेतकरी,उसतोड वाहतूक ठेकेदार व प्रतिष्ठित ग्रामस्थांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी सन्मानाला उत्तर देताना शिंदे बोलत होते.यावेळी सरपंच चनमलप्पा हालोळे,तंटामुक्त अध्यक्ष बसवराज पाटील,गुरुबसप्पा हचडे,उमेश पाटील,सचिन बाणेगाव,श्रीशैल बिराजदार,सुरेश पाटील,बसवराज पाटील,रेवणसिद्ध कुंभार,राजशेखर पाटील, परमेश्वर कुंभार,
डायरेक्टर अभिजित गुंड,उस पुरवठा अधिकारी सुभाष राठोड,श्रीशैल बावकर तसेच वळसंग गटातील सर्व कर्मचारी ,उस उत्पादक शेतकरी व प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना चेअरमन शिंदे म्हणाले की,अंतिम दर हा रिकव्हरी पाहून ठरवणार जाणार आहे. यंदा तालुक्यात वरुण राजाची अवकृपा झाल्याने बहुसंख्य उस उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहेत. या संकटातील शेतकऱ्यांना सध्या धीर देण्याचे काम गोकुळ शुगर्स कडून होत आहे.तालुक्यात सर्वप्रथम २५५५ रुपयाचा दर जाहीर करुन उस दराची कोंडी फोडण्यात गोकुळ शुगर्स कारखानाच आघाडीवर होता.आता पुन्हा एकदा तालुक्यात उसाला उच्चांकी दर देऊन शेतकऱ्यांना धीर दिला आहे.तरी शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस देऊन सहकार्य करावे.सध्या स्पर्धा खूप आहे.तरीही उस उत्पादक शेतकरी,वाहतूक ठेकेदार व कारखाना कामगारांचा हित जपणारा कारखाना असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार यशवंत पाटील यांनी मानले.दरम्यान गोकुळ शुगर कारखान्यांकडून
यंदा सर्वोच्च दर जाहीर करण्यात आल्याने हंजगी,हालचिंचोळी,कर्जाळ,मुस्ती आदी गावातील उस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ चेअरमन दत्ता शिंदे व संपूर्ण गोकुळ टीमना गावपातळीवर आणून सन्मान करुन
उच्चांकी उस दराचे फटाके फोडून स्वागत
करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!