सोलापूर ( प्रतिनिधी ) शहरामध्ये महापालिकेने उपलब्ध केलेल्या मूर्ती संकलन केंद्रांच्या माध्यमातून गणेश विसर्जनाचा सोहळा अत्यंत शिस्तीने व सर्व प्रकारची गर्दी टाळत साजरा करण्यात आला. हत्तुरे वस्ती येथे लिं. सौ मातोश्री सिध्दव्वाबाई हत्तुरे मंगल कार्यालयात मूर्ती संकलन केंद्रात सकाळच्या सत्रात मधील शेकडो भक्तांनी आपल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणून दिल्या. यावेळी *परिवहन चे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे, पत्रकार अजित उंब्रजकर, महेश आठवले* आदींच्या प्रमुख उपस्थितीत गणपती संकलनाला सुरुवात करण्यात आली.
हत्तुरे वस्ती परिसरात आज सकाळपासून गणेश विसर्जनाची धावपळ सुरू झाली. सोलापूर महापालिकेने हत्तुरे वस्ती येथील सिध्दव्वाबाई मंगल कार्यालय येथे मूर्ती संकलन केंद्रे उभारली होते. या केंद्रांवर गणेशभक्त बच्चेकंपनीसह गणेश मूर्ती घेऊन येत होते. या ठिकाणी आल्यानंतर केंद्राच्या ठिकाणी गणेशाची पूजा करून मूर्ती संकलित केली जात होती. दिवसभर प्रत्येक नागरिक स्वतंत्रपणे येऊन मूर्ती केंद्राला देत होता. त्यामुळे बाजारपेठेत मूर्ती विसर्जनाची गर्दी दिसून आली नाही. *मनपा झोन 5 चे अधिकारी प्रकाश दिवाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वडवेराव, श्याम वाल्मिकी, अरुण रानवे, ईश्वर वडवेराव, उत्तम म्हस्के* आदी महापालिकेचे कर्मचारी मूर्ती संकलनासाठी कार्यरत होते. *पोलीस प्रशासनाकडून विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रमेश भद्रशेट्टी, शिवाजी धडके* यांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी *विवेक हत्तुरे, ओंकार हत्तुरे,नागेश पडनूरे,नागनाथ धुम्मा , गणराज पाटील, सोमनाथ मकनापूरे , शिवराज कस्तुरे* आदी उपस्थित होते .