कुरनूर दि.२७ : जागृत पालक सुदृढ बालक ‘ या अभियानांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर ता.अक्कलकोट येथे जागृत पालक सुदृढ बालक या अभियानांतर्गत सर्व रोग निदान तपासणी करण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांना पुढील रुग्णालयात तपासणी, औषधोपचार करण्यासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला.
यावेळी आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. उंबराणीकर, डॉ. वैजनाथ बिराजदार, डॉ . भालेकर मयुरी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पर्यवेक्षक पी .आर. बिराजदार, देशमुख ,वाघमोडे ,जुलेखा बिराजदार, पडवळ, शेख, बनसोडे, कांबळे तसेच चुंगी उपकेंद्राचे आरोग्य सेविका एम. एम .पाटील ,कोरे ,चटमुटगे, इनामदार व आशा वर्कर कुंभार, प्रमिला, ललिता काळे, परवीण पठाण , साहेरा जमादार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.