अक्कलकोट दि-२३. अक्कलकोट शहरात नव्याने एवन चौक येथे बांधण्यात आलेल्या “नविन व्यापारी संकुलनास हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलन” असे नामकरण करावे असे शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार व युवासेना शहरप्रमुख विनोद मदने यानी म्हटले आहे.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जन्मभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटले त्यांचे कार्य संपुर्ण देशाला माहीत आहे. या महापुरुषांच्या कार्याला गौरव करण्यासाठी अक्कलकोट शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलनास हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलन असे नाव द्यावे अशी मागणी अक्कलकोट शहर शिवसेना व शहर युवा सेनेच्या वतीने अक्कलकोट नगरपरिषदेस निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकारी सचिन पाटील यानी निवेदन स्वीकारून या बाबत योग्य निर्णय घेऊ असे म्हणाले. अक्कलकोट शिवसेनेच्यावतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही निवेदन पाठविण्यात आले आहे. असे शहरप्रमुख योगेश पवार म्हणाले.
यावेळी युवासेना शहरप्रमुख विनोद मदने, तालुकाउपप्रमुख प्रविण घाटगे, तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण, शहरप्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुभांर, उपप्रमुख तेजस झुंजे, सचिन विभुते व शिवसैनिक उपस्थित होते.