मुंबई : यापुढे राज्यातील कोरोना रुग्णांना होम आयसोलेशन पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याबरोबरच राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्क्यांवर आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण वाढू नये प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मास्क दंड आणि माध्यमातून उपलब्ध झालेले पैसे म्युकर मायकोसिसच्या जनजागृतीसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असेही टोपे यांनी सांगितले.आतापर्यंत राज्यात १००७ रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार करण्यात येत आहे.एन्फोटेरेसिन इंजेक्शनचे ६० हजार व्हाईल्स १ जून रोजी राज्याला उपलब्ध होणार आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.