ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाकडून घोडेबाजार; पराभवावर आत्मचिंतन करु!: अतुल लोंढे

मुंबई, दि. १४ डिसेंबर २०२१ : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून पक्ष या पराभवावर आत्मचिंतन करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता. भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाकडे ९० मते जास्त असतानासुद्धा मतदारांना घेऊन त्यांना राज्याबाहेर पळावे लागले. त्यांना घोडेबाजार करावा लागला, हा खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. लोकांमधून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव केला.

निवडणुकीत हार जीत होतच असते, काँग्रेस व मित्रपक्षांनी विजयासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले मात्र विजय मिळवण्यात आम्ही कमी पडलो, आम्ही कुठे कमी पडलो? याचे आत्मपरिक्षण करू. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलेल्या काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लोंढे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!