कोलकाता : पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘यास’ चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे.
“यास” चक्रीवादळ हे येत्या २४ तासात म्हणजे उद्या दुपार पर्यंत ओडिशा – बंगालच्या किनारी धडकणार आहे. यामुळे या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याच्या आधी या राज्यातील भागातमध्ये पाऊस सुरू झाला आहे.
ओडिसा, भुवनेश्वर, चांदीपूर, आणि बंगालच्या दीघामध्ये आज पाऊस होत आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.