ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते : आ. प्रणिती शिंदे

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण कामासाठी पंचवीस लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून यामध्ये हुतात्मा स्मारकाच्या स्तंभाला ग्रॅंनाईट फरशी बसविणे, कारंजे बसविणे, स्टेनलेस स्टील रेलिंग बसविणे, फ्लोरिंगला ग्रॅनाईट फरशी बसविणे, लॉन करणे, मुरल दुरुस्तीचे काम करणे, एल.ई. डी. पोल बसविणे इत्यादी कामे या कामाचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते, नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, बाळू पाटील, कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, साई कासव प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सतिष भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आपण सर्व जण बार्डर वर जाऊन लढू शकत नाही पण स्वातंत्र्यासाठी देशासाठी, लढलेल्या, आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते असे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, जेष्ठ नेते राजन कामत, राहुल वर्धा, प्रशांत कांबळे, विनोद व्हटकर, लक्ष्मीकांत साका, सुशील बंदपट्टे, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, योगेश मार्गम, अभिराज गायकवाड, अविराज आनंदकर, मल्लिनाथ सोलापूरे, इस्माईल हुलसुरे, उपेंद्र ठाकर, प्रभाकर सादुल, शिव कोरे, परशुराम सतारेवाले, रमाकांत साळुंखे, राजेश झंपले, पंडित बुवा, महापालिकेचे अधिकारी परशुराम बोंमकंटी, निलेश कंदलगावकर यांच्यासह त्या भागातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चिटणीस ॲड. मनिष गडदे यांनी सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, तर आभार प्रदर्शन सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!