ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या “या” बड्या नेत्यांने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

दिल्ली : दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभेचे स्पीकर राहिलेले योगानंद शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी काँग्रेसच्या योगानंद शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.  पक्षाचे दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठीस आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत, असे या वेळी शरद पवार यांनी सांगितले. योगानंद शास्त्री यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशा संदर्भात स्वतः शरद पवार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

योगानंद शास्त्री यांचे प्रवेशाबाबत गेल्या काही महिन्यापासून चर्चा सुरू होती. देशाच्या राजधानीत राष्ट्रीय पक्षाचे चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत. दिल्लीतील जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी सूचना शरद पवार यांनी केली. त्याचा स्वीकार योगानंद शास्त्री यांनी केला. त्यांचे कार्यकर्तेही पक्षात आले आहेत, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 17 नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत विदर्भ दौरा करणार आहेत दौऱ्यादरम्यान नागपूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते व्यापारी शेतकरी आणि उद्योजक आम सोबत चर्चा करतील. विदर्भात भाच्याचे सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता शरद पवार विमानाने नागपूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ३ वाजता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!