अक्कलकोट,दि.११ : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र चप्पळगाव येथे हाल क्लाऊड क्लिनिक मशीन उपलब्ध झाली आहे.त्याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मंगलाताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला.कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून लवकर ही मशीन उपलब्ध झाली आहे.
या मशिनद्वारे अनेक प्रकारच्या तपासण्या करून इन्स्टंट रिपोर्ट जागेवर देते जसे की वजन, उंची, तापमान, ऑक्सिजन लेवल, डोळ्यांची दृष्टी तपासणे, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण २३ तपासण्या एकाच मशीनवर एकाच ठिकाणी करू शकतो. याचा जास्तीत जास्त उपयोग ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर मातांना होणार आहे.
इतक्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी बराच वेळ जातो पैसे खर्च होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या तपासण्या कराव्या लागतात याचप्रमाणे प्रत्येकी आर्थिक भार सुद्धा सोसावा लागतो. आता चपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही मशिन उपलब्ध झाल्याने जि. प सदस्या मंगलाताई कल्याणशेट्टी यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मशीनची पूजा मंगलाताई कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्रावण गजधाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेड,डॉ. थोरात, डॉ.येरवाडकर, सुनील माशाळे, डॉ.परमेश्वर बिराजदार, आरोग्य सहायक नडीमेंटले, राजशेखर लोकापुरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक व आरोग्य सेविका सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंगलाताई कल्याणशेट्टी यांनी सदर मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे देखील आभार मानले.