ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटल मधील डायलिसिस युनिटचे लोकार्पण, प्रिसिजन च्या सीएसआर निधीतून केली मदत

सोलापूर- प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेड च्या सीएसआर निधीतून डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटल येथे देण्यात आलेल्या डायलिसिस युनिटचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे अधिकारी नीरज धोरे, प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेडचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा, डॉ आनंद कांबळे डॉ रामकृष्ण माने इ मान्यवर उपस्थित होते. प्रिसिजनच्या माध्यमातून डॉ. कोटणीस रेल्वे हॉस्पिटल येथे एक डायलिसिस युनिट आणि त्याला लागणाऱ्या आर ओ प्लान्टचे युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा हा लोकार्पण सोहळा होता.

लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ शुहासिनी शहा बोलताना म्हणाल्या कि प्रिसिजन सीएसआर च्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे, शैक्षणिक आरोग्य आणि शाश्वत विकास यासाठी प्रिसिजन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही प्रिसिजनच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे १२ डायलिसिस युनिटचा अत्याधुनिक वॉर्ड व सुसज्ज ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, मार्कण्डेय व स्पिन रुग्णालयात ऑक्सिजन मशीन तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन प्रिसिजनच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय रेल्वे अधिकारी नीरज धोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सीएसआर निधीचा असाही उपयोग केला जाऊ शकतो हे एक उत्तम उदाहरण आहे. रेल्वे हॉस्पिटल सामान्य लोंकाना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोविड काळात रेल्वे हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद राहिलेले आहे असे त्यांनी सांगितले.

प्रिसिजन च्या सीएसआर निधीतून देण्यात आलेल्या डायलिसिस मशीनचा सामान्य रुग्णांना उपयोग होईल. प्रिसिजननी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमावेळी रेल्वे अभियांत्रिकी विभागप्रमुख श्री चंद्र भूषण, वरिष्ठ वित्त व्यवस्थापक विवेक होके, डॉ सिंघल तसेच डॉ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, नर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!