इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने टाकला परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर छापा, “इतक्या” कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या
कानपुर : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून रोज छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला. या छाप्यात व्यापाऱ्याच्या घरात पैशांचे मोठा घबाड सापडला आहे. पियुष जैन हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजण्यासाठी मशीन मागवण्याची वेळ आली. शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर सुरु असलेल्या छापेमारीत जवळपास दिडशे कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जात आहे.
शिखर पान मसाल्याचे मालक पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित ठिकाण्यांवर छापेमारी करण्यात आली होती.