ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Ind vs Aus 1st Test : टीम इंडियाला दुसरा धक्का, मयंक अग्रवाल माघारी

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली आहे. भारताला दुसरा धक्का बसला आहे. दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर मयंक अग्रवाल देखील माघारी परतला आहे.

 

मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी खेळपट्टीवर स्थिरावत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. परंतू या भागीदारीदरम्यान दोन्ही फलंदाज अत्यंत धीम्या गतीने खेळले. मैदानात पाय स्थिरावल्यानंतर मयांकने फटकेबाजी करत धावा जमावण्याचा प्रयत्न केला. परंतू पॅट कमिन्सच्या एका चेंडूवर अग्रवाल पूर्णपणे फसला. टप्पा पडून आता आलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला, मयांकने १७ धावा केल्या.

 

यानंतर कर्णधार विराट आणि पुजाराने अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत पहिलं सत्र खेळून काढलं. पहिल्या सत्राअखेरीस भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात ४१ धावांपर्यंत मजल मारली.

 

 

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

 

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन आणि मॅथ्यू वेड.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!