अक्कलकोट: रमाई आवास व प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रॉस वाळु देण्यात यावे, वाळु उपलब्ध नसल्यामुळे अनेक बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने मिस्त्री व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नदीकाठच्या ठिकाणची वाळु लिलाव लवकर करावे, पूरग्रस्त शेतकऱ्यांना आद्यपही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, श्रावण बाळ योजना व निराधार योजनाच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.
बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड, जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,शहर अध्यक्ष प्रसाद माने, यु.ता. अध्यक्ष अप्पा भालेराव, विजयकुमार पोतेनवरू, अंबादास गायकवाड, रवी सलगरे, चंद्रकांत गायकवाड, मंजुनाथ बनसोडे, शुभम मडिखांबे, आकाश मडिखाबे, अंबादास शिंगे, सुरेश सोनकांबळे, तम्मा धसाडे, परमेश्वर आयवळे, प्रशांत मडिखांबे, सुरेश वसोनकांबळे, शिवानंद धोडमणी, संगोळगी सरपंच बसुराज निम्मे, कृष्णा धोडमणी रमेश धोडमणी, गुंडु कांदे शिवराज जमगे श्रीकांत गायकवाड नागेश मडिखाबे उपस्थित होते