बार्शी शासकीय गोदाम येथील हमाल मापाडी यांचा बेमुदत संप चालू; ठेकेदाराने हमाली चे 13 महिन्याचे 31 लाख रुपये वेतन थकवले
बार्शी : बार्शी येथील शासकीय गोदाम या ठिकाणी काम करणारे हमाल मापाडी यांनी आजपासून बेमुदत संप चालू केला असून स्वस्त धान्य वितरण यंत्रणा आता बार्शीत या संपामुळे काही दिवस ठप्प राहणार आहे हमाल मापाडी महामंडळाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वात आज पासून हा बेमुदत संप सुरू झाला आहे.
कोरा नाताळाची या हमाल लोकांनी हमाली वारणी आणि मापाडी काम चालू ठेवले होते मात्र गेली 13 महिने या हमालांचे असलेले सोलापूर येथील मनोहर माथाडी संघटनेचे ठेकेदार संदीप गायकवाड यांनी या हमालांचे 13 महिन्यापासून चे वेतन थकले आहे आता हे वेतन मिळेपर्यंत व सदर ठेका रद्द होऊन हमाल मापाडी बोर्डामार्फत वेतन सुरू होण्या पर्यंत हा संपत चालू राहील असे यावेळी शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, गेली तेरा महिने संघटनेच्या सभासद असलेल्या हमालाना हमालीची रक्कम आजपर्यत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर व स्वत:वर उपासमारीची वेळ आलेली आहे.
माहे मे 2020 ते डिसेंबर 2020 मधील पंतप्रधान गरीब योजनेअंतर्गत झालेल्या एकुण हमालीची रक्कम 1668910/- अक्षरी ( सोळा लाख अडुस्थ हजार नऊशे दहा रुपये फक्त ) व अन्न सुरक्षा योजनेमधील माहे डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 पर्यतची रक्कम 1502012/- अक्षरी ( पंधरा लाख दोन हजार बारा रुपये फक्त )दोन्ही मिळून रक्कम रु 3170922 /- अक्षरी ( एकतीस लाख सत्तर हजार नऊशे बावीस रु फक्त ) हमालीचे रक्कम मनोहर माथाडी कामगार सह.संस्था सोलापूर संदीप मनोहर गायकवाड यांनी आजपर्यत सदरच्या हमालीच्या रक्कमेचा संपूर्ण भरणा माथाडी बोर्डाकडे केलेला नाही. तरी संबधिताकडून सोलापूर जिल्हा माथाडी बोर्ड यानी त्वरित सदर रक्कमेची वसूली करून संबधित हमालाना रक्कम अदा करावी.
यासाठी वारंवार पत्रव्यहार करूनही आजपर्यत जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे हा संप चालू केल्यापासून ही थकलेली सर्व तत्काळ रक्कम जमा झाली पाहिजे तसेच सदरचा ठेकेदारचा ठेका रद्द करण्यात यावा. अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.
यावेळी गोरख जगताप, संतोष सावंत, लक्ष्मण मूकटे, सुनील फफाळ, महादेव करडे, ताजुद्दीन शेख, यासह नोंदणीकृत सोळा हमाल मापाडी संपात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनास महात्मा फुले समता परिषद बार्शी शाखा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, बार्शी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष जिवदत्त आरगडे यांनी पाठींबा दिला आहे.