तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१८ : प्रत्येक मानवी अवयव हे अतिशय महत्वाचा आहे.आधुनिक यांत्रिक युगात साधनसुविधांचा योग्य वापर करून आपण सर्वसाधारण जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी केले. जागतिक कर्णबधीर दिनाचे औचित्य साधून दोघा गरजूंना लायन्स क्लब अक्कलकोटचे चार्टर मेंबर डॉ.अरुण परिचारक यांच्यातर्फे मोफत श्रवणयंत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
लायन्स प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम पार पडला. प्रत्यक्ष श्रवणयंत्र लावल्यावर त्यांना चांगल्याप्रकारे ऐकू येऊ लागल्यामुळे ते अतिशय आनंदित झाले,त्यांना झालेला आनंद पाहून उपस्थित सर्वांना खूप समाधान वाटले. समाजातील गरजूंना त्यांची गरज ओळखून केलेले काम हे नेहमी आनंद देणारी असते,लायन्स क्लब अक्कलकोटचे पदाधिकारी व सदस्य हे नेहमीच समाजासाठी चांगले काम करत आहेत,त्यांच्या चांगल्या कामासाठी मी या प्रांताचा प्रांतपाल म्हणून नेहमीच आपल्या सोबत आहे,असे राजशेखर कापसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
डॉ.परिचारक यांनी त्यांच्या पत्नी कै. सरोजनी परिचारक यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवून या कार्यक्रमात श्रवणयंत्राचे महत्व सांगून वापरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
याप्रसंगी सचिव संतोष जिरोळे,खजिनदार सुनिल बिरादार, प्रभाकर मजगे,मल्लिनाथ साखरे,सुभाष गडसिंग,शिवपुत्र हळगोदे राजशेखर चनशेट्टी,राजशेखर हिप्परगी,सुभाष खमीतकर,शिरीष पंडित,ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र हत्ते,डॉ.विवेक करपे,शदिद वळसंगकर शिवशरण खुबा,डॉ.आसावरी पेडगावकर ,मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटणे यांनी केले व तर आभार संतोष जिरोळे यांनी मानले.