कुरनूर : जीवनाच्या वाटेवर चालत असताना यश अपयश हे येत असते विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्द बाळगून अंगी बाळगलेले स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन अक्कलकोट महिला काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केले.ते जीवन ज्योती क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीनाथ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. जमादार होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर अभ्यासामध्ये सातत्य ठेवून परीक्षेला सामोरे जावे आणि यश काबीच करावे. प्रयत्न प्रमाणिक असेल तर यश नक्कीच मिळते असेही ते म्हणाले. व्यासपीठावर मुख्याध्यापक सातलिंग शटगार, देवराज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके, स्मिताराणी चिवटे, संतोष बिराजदार, गिरीश शिंदे, संतोष पवार, बाबा बनसोडे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जमादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन प्रशासकीय सेवेमध्ये सक्रिय व्हावे. आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावे असे ते म्हणाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी आशाराणी डोके संतोष बिरादार आदी शिक्षकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत अतिथींचा परिचय प्रास्ताविक मुख्याध्यापक सातलिंग शटगार यांनी केले. यावेळी विद्यार्थी हरी पिटला, मुजफ्फर शेख, कीर्ती मदभावी, शिफा मुजावर यांनी शिक्षकांबद्दल व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष पवार यांनी केले तर आभार श्री. गिरीश शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मिताराणी चिवटे, बाबा बनसोडे, मल्लिकार्जुन कोळी, अशोक विजापुरे, चंद्रकला कांबळे आदींनी परिश्रम घेतले.