ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी टिकवून ठेवणे गरजेचे ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे

अक्कलकोट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडुन लढवून भाजपला रोखायचे असेल तर आपपल्यात मतभेद न करता सर्वांनी बसून निर्णय घेऊया आणि जो उमेदवार असेल त्याला आपण निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करूया असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीहीप्परगे तालुका दक्षिण सोलापूर येथे त्यांचा नागरी सरकारचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ नेते बळीराम काका साठे होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, माजी सभापती अप्पाराव कोरे , सामाजिक कार्यकर्त्या तथा महेश माने यांच्या पत्नी मनीषा माने , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संगमेश बगळे , रवी होनराव , बळीराम हेबळे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

तीन वेळा तालुक्याचा अध्यक्ष होण्याची संधी असताना आणि मी स्वतः त्यांना तालुका अध्यक्ष करण्यासाठी इच्छुक असताना देखील महेश माने यांनी कित्येकदा इतरांची शिफारस करत त्यांना अध्यक्ष केलं. पक्ष वाढण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी वारंवार प्रयत्न चालू असतात. रोजच्या रोज लोकांच्या संपर्कात राहून लोकांची काम करण्यातच समाधान मानतात. रोज कोणाचं ना कोणाचं एखादं तरी काम सांगण्यासाठी माझ्याकडं येत असतात. संघर्षातून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण त्यांनी केलं आहे. अशा कार्यकर्त्याला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बोरामनी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महेश माने यांनी शुभेच्छा देताना वक्तव्य केले.

आपल्या शुभेच्छा देताना अमर पाटील यांनी महेश माने यांच्या संघर्षाचा आणि कार्याचा उल्लेख करीत त्यांना भविष्यात संधी देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यांच्यासारखे नेतृत्व तयार होणे हे आगामी काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा माने यांनी एकमेकांच्या पाठिंब्यावर आपण कार्य करत असल्याचे सांगत जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री चा हात असतो त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुषाचा हात असतो. असे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना महेश माने म्हणाले की, कार्यकर्ते , सोबतचे लोक आणि बोरामणी भागातील लोकांच्या आग्रहाखातर आपण जिल्हा परिषद साठी इच्छुक आहोत. माझ्यामागे कोणताही राजकीय वारसा नसताना माझ्यावर जी संघर्षाची वेळ आली ती इतरांवर येऊ नये हा प्रामाणिक हेतू ठेवून लोकांची काम करत करत मी इथवर आलो. माझे वडील लहान असताना वारले परंतु काका साठे यांनी मला कधीच वडिलांची कमी भासू दिली नाही. माझ्या बद्दल मध्यंतरी पक्ष बदलण्याच्या अफवा पसरवल्या. प्रसंगी भाजप सहित इतर पक्षाच्या नेत्यांनी संपर्क साधून ऑफर दिली. परंतु जोवर शरद पवार साहेब आहेत नी काका साठे आहेत तोवर पक्ष बदलण्याचा अजिबात विचार करणार नाही. माझ्या बाबतीत जे काही बरेवाईट करायचे आहे किंवा माझ्या राजकीय भवितव्याचा जो काही निर्णय घ्यायचा आहे ते काका साठे हेच घेतील. मी त्यांना वडील मानलं आहे. एक बाप कधीही आपल्या पोराचं वाटोळे करणार नाही आणि होऊ देणार नाही असे म्हणत भावनिक झाले.

यावेळी माजी सरपंच शंकर यादव , ग्रामपंचायत सदस्य भाऊराव जाधव , बालाजी यादव , राम जाधव ,राहुल जाधव , रतन राठोड , तुकाराम कोळेकर , अकबर शेख , मलिक शेख, मशाप्पा कोळी , विश्वनाथ कुमठेकर , शुभम यादव , मोहसीन फुलारी , रणजित चौगुले , दत्तात्रय नरवडे , तानाजी जाधव , मलसिद्ध धुमाळे , दत्तात्रय निकम , दिगम्बर निकम , बाबासाहेब माने , उपसरपंच मनोज महाडिक , अप्पा माने , गणेश निकम , अप्पा निकम , नागेश पवार , अक्षय पवार , श्रीधर यादव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.हणमंत पवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!