ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विना मास्कवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मास्क द्या,जनतेची मागणी ! पोलीस कारवाईने अक्कलकोट तालुक्यातील जनता त्रस्त

 

अक्कलकोट,दि.२३ : अक्कलकोट शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तर पोलीस ठाणे व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना कडून कोरोना प्रतीबंधाच्या धर्तीवर विना मास्क असणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची तसेच नागरीकांची मोठ्या प्रमाणावर लुट होत आहे. तरी अक्कलकोट तालुक्यातील उत्तर पोलिस ठाणे व दक्षिण पोलिस ठाणे पोलिस ट्राफिक पोलिस व सर्वसामान्य नागरिकांना यांच्यामध्ये विना मास्क म्हणून पाचशे रुपये दंड केल्यामुळे वाद निर्माण होत आहेत. ट्राफिक पोलिस यांना दिलेले टार्गेट हे चुकीच आहे त्यामध्ये वरीष्ठ अधिकारी यांनी बदल करून दंड करण्यापेक्षा मास्क उपलब्ध करून देण्यात यावे,विनाकारण सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई म्हणा अशा पोलिस अधिकाऱ्यांवर सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी त्वरित रितसर चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील जनतेतुन होत आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक म्हणतात की पोलीसांनी विनाकारण दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना अडवून नाहक ञास देऊ नका आणि त्यांच्याच पोलीस कर्मचारीवर्गाकडुन त्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे.यामुळे नागरिकांमध्ये ट्राफिक पोलीस प्रशासनावर प्रचंड नाराजी दिसून येत आहे.गेल्या वर्षभरापासून अक्कलकोट ते सोलापूर महामार्गावर काळी पिवळी प्रवासी वाहतूक जीप बंद असल्याने मालक व चालक यांच्या कुटुंबीयांवरती उपासमारीची वेळ आली आहे.पण त्यांचा कोणीही विचार करीत नाही. एकीकडे सर्व खाजगी प्रवासी वाहतूक चालू असताना फक्त जीप बंद करणे म्हणजे त्यांच्यावर जाणूनबुजून अन्याय केल्यासारखे आहे,असे त्यांचे मत आहे. अक्कलकोट तालुक्यातील एसटी महामंडळाच्यावतीने सोडल्या जाणार्‍या सर्व बस ह्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून जातात त्या बस मध्ये चेंगराचेंगरी होईल एवढी प्रचंड गर्दी असते त्या प्रवाशांना कोरोना होत नाही का?
का त्यांना कोरोना प्रतिबंध कार्यवाही करण्यात येत नाही ?
खाजगी जीप मध्ये गेले तरच कोरोना होतो का? महामंडळाच्या जाणार्‍या बसला प्रतिबंधात्मक कार्यवाही करा व खाजगी वाहन चालक ,मालकांना कोरोनाची परिस्थिती समजून सांगा, गोरगरिबांना विना कारण त्रास देऊ नका, पोलीस प्रशासनाने अक्कलकोट शहर व तालुक्याच्या जनतेला आवाहन करुन सांगण्याऐवजी नागरिकांनाच लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.या सर्व घटनेबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट
तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.दरम्यान या प्रकरणी अविनाश मडिखांबे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना हा विषय गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ईमेलद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!