अक्कलकोट, दि.६ : २०२३ -२४ च्या
गळीत हंगामात जय हिंद शुगरने ॲडव्हान्स
व बिगर ॲडव्हान्सच्या ऊस तोडणी वाहतूक दारांसाठी आकर्षक बक्षीस योजना व नूतन ऊस तोडणी वाहतूक धोरण जाहीर करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन
गणेश माने देशमुख व प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावर्षीचा गाळप हंगाम नुकताच सुरू झालेला आहे यामध्ये बिगर ॲडव्हान्समध्ये ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी टनेजनुसार इतर शेजारील कारखान्यांच्या तुलनेत भरीव असे वाढीव कमिशन दिले जाणार आहे आणि ते वेळच्या वेळी अदा केले जाईल. शेतकरी आणि कारखानदार यामध्ये ऊस तोडणी वाहतूकदार हा दुवा असतो.या वाढीव कमिशनमुळे कारखान्याला चार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत तसेच बक्षीस योजनेसाठी एक कोटी रुपये अशा एकूण पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त भार कारखान्याला सोसावा लागणार आहे.बक्षिस योजनेमध्ये ट्रक आणि ट्रॅक्टर साठी ५०० ते ७५० मेट्रिक टन वाहतूक ५ हजार रुपये, ७५१ ते १००० मेट्रिक टन ११ हजार रुपये, १ हजार मेट्रिक टनच्या पुढे २१ हजार रुपये, मिनी ट्रॅक्टरसाठी ५०० ते ७५० मेट्रिक टन ५ हजार रुपये , ७५१ ते १ हजार
मेट्रिक टन ११ हजार रुपये,१ हजार मेट्रिक
टनच्या पुढे २१ हजार रुपये तसेच ऊस
तोडणी मशीन साठी ५ हजार मेट्रिक टनाच्या
पुढे ७५ हजार रुपये बक्षीस हे ॲडव्हान्स
व बिगर ॲडव्हान्स ऊसतोड वाहतूक
करणाऱ्या वाहनांसाठी देण्यात येणार आहे.
यासाठी कारखान्याने स्वनिधीतून १ कोटी
रुपये तरतूद केले आहेत.तोडणी वाहतूक खर्चात याचा हिशोब धरला जाणार नाही शेतकऱ्यांवर कोणताही भार या योजनेमुळे पडणार नाही.केवळ ऊस पुरवठादारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कारखान्याने हे पाऊल उचलले आहे.विशेष म्हणजे ९९ टक्के तोडणी वाहतूकदार हे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या परिसरातील आहेत त्यामुळे त्यांना या योजनेचा नक्की फायदा होईल,असेही माने देशमुख यावेळी म्हणाले.तसेच यावर्षीच्या गळीत हंगामाला येणाऱ्या उसाला पहिला हप्ता प्रति टन २५११ रुपये जाहीर केला आहे.अंतिम दर नंतर ठरेल. उत्पादित साखर पोत्याचे पूजन नुकतेच झाले आहे दररोज किमान दहा हजार मेट्रिक टन गाळप या कारखान्याच्या माध्यमातून होत आहे शेतकऱ्यांची बिले वेळेत देण्याबरोबरच यावर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मोफत साखर वाटप करण्यात येत आहे,असेही
त्यांनी सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेला कारखान्याचे व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी देशमुख, केन मॅनेजर सी.बी जेऊरे,शेतकी अधिकारी राहुल घोगरे,विजय पाटील, ऊस विकास अधिकारी दत्तात्रय तोरणे,विक्रमसिंह पाटील आदी उपस्थित होते.