अक्कलकोट, दि.९ : आचेगाव येथील
जयहिंद शुगरने गळीत हंगामप्रसंगी प्रतिटन पहिला हप्ता म्हणून २५११ रुपये दर जाहीर केला होता.मात्र शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सुधारित पद्धतीने पहिल्या दिवसापासुन आलेल्या ऊसाला प्रतिटन पहिला हप्त्यापोटी २७०० रुपये दर देणार असल्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच अंतिम दर गळीत हंगामाच्या शेवटी रिकव्हरी पाहुन निश्चित करणार असल्याचे त्यांनी यावेळी केले.यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी.देशमुख म्हणाले की, चेअरमन गणेश माने देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसदराच्या पहिल्या हप्त्याची बिले जयहिंदच्या परंपरेनुसार
अदा करण्यासाठी अर्थ विभाग सज्ज आहे.इतर कारखान्यांना आम्ही आव्हान देतो की,आमच्या अगोदर कोणीही घोषित
हप्त्याचे पेमेंट वेळेत करुन दाखवावे आणि शेतकऱ्यांनी देखील यंदाचा गळीत हंगाम होईपर्यंत त्याचे निरीक्षण करावे,
असे आव्हान त्यांनी दिले.कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख म्हणाले की,ऍडव्हान्स व बिगर ऍडव्हान्स तोडणी वाहतुकदारांची बिले आता पंधरवडाऐवजी दर आठवड्याला अदा केले जातील.तर गळीत हंगामाच्या सर्व बाबींचे अधिकार मॅनेजिंग डायरेक्टर आर.पी.देशमुख यांना दिले आहेत,असेही त्यांनी सांगितले.यावेळी व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,केन मॅनेजर सी.बी जेऊरे,शेतकी अधिकारी राहुल घोगरे,विजय पाटील,ऊस विकास अधिकारी दत्तात्रय तोरणे,विक्रमसिंह पाटील, रमेश क्षीरसागर आदीसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.