अक्कलकोट, दि.१२ : गुरुवारी सायंकाळी
जय हिंद शुगरच्या व्यवस्थापनाकडून सुधारित ऊस दर जाहीर करण्यात आला आणि लागलीच दुसऱ्या दिवशी पाच नोव्हेंबर पर्यंत आलेल्या ऊसाला प्रतिटन २७०० रुपये पहिल्या हप्त्यापोटी जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली.ऊस बिलासोबतच तोडणी वाहतूकदारांचीही पाच नोव्हेंबर पर्यंतची बिले अदा करण्यात आली आहेत.कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी त्यांच्या खात्यावर वेतन देखील जमा करण्यात आली आहे.जयहिंद परिवारातील शेतकरी कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यासाठी जयहिंद शुगरकडून सुधारित ऊस दर जाहीर झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी बिले
अदा करण्यात आल्याची भावना प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी व्यक्त केली.चेअरमन माने देशमुख यांनी सुधारित ऊसदर जाहीर केला आहे त्यानुसार पेमेंट तात्काळ करण्यात आले आहेत.जयहिंदच्या परंपरेनुसार इतर कारखान्यांच्या तुलनेत कमीत कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा लावली आहे.या बाबीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील निरीक्षण करावे,
असे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी.
देशमुख यांनी सांगितले.