ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माने देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ११ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ; वाढदिवसानिमित्त सत्कार

 

अक्कलकोट, दि.२१ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जय हिंद शुगरचे कार्यकारी संचालक बब्रुवान माने देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना परिसरात ११ हजार वृक्ष लागवड मोहिमेच्या महाअभियानाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला.टप्प्याटप्प्याने ही झाडे लावण्यात येणार आहेत यामुळे हा परिसर हिरवागार होण्या बरोबरच शुद्ध हवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आल्याचे कारखान्याचे अध्यक्ष गणेश माने देशमुख यांनी सांगितले. वाढदिवसाच्या औचित्य साधून विजापूर रोडवरील हॉटेल शनाया येथे सत्कार समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास सर्वच मान्यवरांनी बब्रुवान
माने देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.ते मितभाषी आणि अतिशय संयमी आहेत.जय हिंद परिवाराच्या वाटचालीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे
त्यांचा व्यापक जनसंपर्क असल्याने ते थेट शेतकऱ्यांशी जोडले आहेत,असा सूर वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी काढला.खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.आशीर्वाद संदेशात महास्वामी यांनी जय हिंदच्या परिवाराच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेक मान्यवरांनी फोनवरून देखील माने देशमुख यांना
शुभेच्छा दिल्या.सायंकाळी शनायाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी वळसंग सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे,कारखान्याचे मार्गदर्शक शालिवाहन माने देशमुख,उपाध्यक्ष विक्रमसिंह पाटील,
महादेव कोगनुरे,सुधीर खरटमल दिलीप सिद्धे,मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र देशमुख,क्रेडाई चे अध्यक्ष दत्ता मुळे, पोलिस निरीक्षक कोलाळ साहेब ,माजी नगरसेवक विनोद भोसले,मुख्य शेतकी अधिकारी जेऊरे,मोहन चिंतलवार,रवी मेंगर,आर.गोकुळ, विजय पाटील,विश्वनाथ भरमशेट्टी,सुनील उगाडे,अमित इंडे, नौशाद शेतसंधी, मचाले, सुलतान शेख, युवराज आरेकर आदींसह ऊस तोडणी वाहतूकदार,ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली जाधव यांनी केले.सूत्रसंचालन काशिनाथ भतगुणकी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!