अक्कलकोट, दि.२७ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगरचे चेअरमन तथा काँग्रेसचे युवा नेते गणेश माने देशमुख हे कोरोना पॉझिटिव आले आहेत.त्यामुळे संपर्कात आलेल्या मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपली
चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी
केले आहे.
काही दिवसांपूर्वी माने देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यानंतर ते सोलापूरलाही आले होते.कारखानदारी व्यवसाय व इतर कारणामुळे त्यांना वारंवार पुणे-मुंबई सारखे जावे लागते.त्यांना सध्या तरी काहीच लक्षणे नाहीत मात्र त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव आला आहे.त्यामुळे ते स्वतःहून होम आयसोलेट झाले आहेत.
संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.