ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीकक्षासाठीचे प्रवेश पत्रक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून त्या आता 26 जुलै 27 जुलै 31 ऑगस्ट एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर या तारखांना होणार आहेत. इच्छुक विद्यार्थी jeemain.nta.nic.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार सेशनमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!