पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्रसिद्धी द्यावी ; अक्कलकोट येथे तहसीलदारांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार
अक्कलकोट दि.११ : पत्रकारांनी विकासात्मक बातम्यांना प्रसिद्धी देऊन माध्यम धर्माचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ व अक्कलकोट तालुका गुरव समाजाच्यावतीने आयोजित पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह.भ.प. काशिनाथ महाराज गुरव हे होते. प्रास्ताविक व स्वागत आयोजक शिवानंद फुलारी यांनी केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर म्हणाले, लिपस्टिक पावडरवाली पत्रकारिता लोकशाहीला घातक असल्याचे सांगितले. बाबा निंबाळकर यांनी अक्कलकोटची पत्रकारिता सकारात्मक पत्रकारिता असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांचा सन्मान सोहळा स्वप्नपूर्ती लॉजच्या सभागृहात पार पडला. लॉजचे मालक रामेश्वर पाटील यांनी कार्यक्रमासाठी सभागृह मोफत देऊन सहकार्य केले.
प्रारंभी स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. विविध दैनिक, साप्ताहिक, मासिकाचे ३० प्रतिनिधी उपस्थित होते. त्या सर्वांचा शाल, पेन, डायरी, गुच्छ, देऊन गौरविण्यात आले. यंदाचे पहिले वर्षे असून दरवर्षी हा कार्यक्रम केला जाणार आहे. अशी माहिती पोलीस पाटील संघाचे फुलारी-पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी गुरव समाजाचे उपाध्यक्ष रमेश फुलारी, बसवराज फुलारी, शिवानंद पुजारी, दीपक गुरव, उदय पाटील, स्वामींनाथ गुरव, यांच्यासह पोलीस पाटील संघाचे सचिव उमेश देडे, महादेव बिराजदार, अंबणा अस्वले, सुशांत बिराजदार, संजय बिराजदार, चिदानंद हिरेमठ, महेश घवारे, गेनसिद्ध सुरवसे, मळसिद्ध कांबळे, प्रकाश बिराजदार, शिवाजी कोरे, शांताबाई भंगरगी भुरीकवटे, शैलजा पाटील ,शुभांगी प्रवीण बाबर, चंद्रकला गायकवाड, मीनाक्षी किणगी, अर्चना उमेश पवार, रेशमा जगताप यांनी परिश्रम घेतले.
या पत्रकार सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन विद्याधर गुरव यांनी केले तर आभार महादेव बिराजदार यांनी मानले