सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कपिल बलभीम शिंदे तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून विशाल (भैय्या) गणपत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर कारखाना परिसरात जल्लोष करण्यात आला.
गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या निधनानंतर मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन या दोन्ही पदांची जबाबदारी दत्ता शिंदे यांच्याकडेच होती . दत्ता शिंदे यांनी मॅनेजिंग डायरेक्टर पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर बंधू कपिल बलभीम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे . कपिल शिंदे हे उच्चविद्याविभूषित आहेत त्याचबरोबर चुलत बंधू विशाल (भैय्या) गणपत शिंदे यांची कारखान्याच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर निवड करण्यात आली आहे.
दोन्ही निवडीची घोषणा चेअरमन दत्ता शिंदे यांनी शनिवारी केली. त्यानंतर कारखान्याच्या वतीने उभयतांचा दत्ता शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे , गोकुळ भाऊ शिंदे, गणपत शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब कुटे , मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह शिरसागर, चीफ केमिस्ट बाळासाहेब दिघडे , प्रॉडक्शन मॅनेजर उमरबंड , लेखा विभागाचे उमेश पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.