ध्यास विश्वसार्ह बातमीचा

BREAKING…! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. आज दुपारी येडियुरप्पा यांनी राज्यपाल यांना भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत. ही माहिती खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली प्रसार माध्यमांसमोर दिली.

‘मी राजानाम्याचा निर्णय घेतला आहे,  दुपारी भोजनेच्या वेळेनंतर मी राज्यपालांची भेट घेणार आहे’ असं येडियुरप्पा यांनी सांगीतले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे,  असे सांगतानाच येडियुरप्पा भावुक झाल्याचे दिसुन येत होतं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. यडीयुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर पुढचे मुख्यमंत्री कोण भुषविणार ? हा उत्सुकतेचा विषय बनाला आहे.

येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा केली जात आहे. यामध्ये खाणमंत्री मुरुगेश निराणी,  अरविंद बेल्लद,  केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

या तीन नेत्यांच्या नावांशिवाय विजयपुराचे आमदार बसन्नगौडा पाटील यत्नाळ, बसवराज बोम्माई,  बीएल संतोष,  सीएन अश्वथ नारायण,  लक्ष्मण सवडी,  गोविंद कर्जोल,  विश्वेश्वरा हेगडे कागेरी  आणि सी. टी. रवी यांचीही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चिली जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!